Saturday, May 14, 2011

वेडेपणा...

काळीज माझे गुंतले अन भोवला वेडेपणा
’शहरात या तू एकटा!’ म्हणला मला वेडेपणा

रात्री कुणी हाकारले ओळख मला ना लागली
मी बोललो ’तू कोण रे?’ तो बोलला ' वेडेपणा!'

एकांत हा दःखी करे वणवण जिवाची ना टळे
आम्ही पुरे कंटाळलो कंटाळला वेडेपणा

माझ्या रथाला हाकता तू सोबती तू सारथी
ना माहिती आहेस तू माझ्यातला - वेडेपणा!

साकी विचारे सारखी ’आहेस का रे तू सुखी?’
ओलावल्या दुःखातुनी मी कोरला वेडेपणा

स्वप्नात माझ्या सारखा तो चंद्र येतो एकटा
माझ्या परी त्याच्या जगी आकारला वेडेपणा

- स्वानंद

प्रेरणा:
http://www.youtube.com/watch?v=qH5q-v8tvF4

2 comments:

इंद्रधनु said...

great....

श्रिया (मोनिका रेगे) said...

सुंदर कविता!तिसरे कडवे छान वाटले..वेडेपणाला देखील कंटाळा आला आहे आणि तोही एकांताला कंटाळला आहे कल्पना आवडली.
वेडेपणा सोबती,सारथी आणि दुःखातुनी कोरलेला वेडेपणा हि कडवी खूप छान आहेत.