Thursday, July 21, 2011

खंत

स्वप्न नाही एकही जमले मला साकारणे
देत गेलो शेवटी मी कारणांना कारणे

चढविला आहे मुलामा हासरा ओठांवरी
काळजाला ना जमे जखमा जुन्या नाकारणे

धावतो पाठीस माझ्या दावतो काठी मला
'काळ' करतो काम त्याचे मेंढरा हाकारणे

-स्वानंद

1 comment:

श्रिया (मोनिका रेगे) said...

कविता खूप सुंदर आहे तुझी स्वानंद, कवीची खंत जाणवते...

ह्या माझ्या काही ओळी

'शेकडो वाक्ये अशी का साधिसी तू हे कवी
धीर सोडूनी नको हे, शब्द सांडत मांडणे'

'जा असा घेऊन शक्ती कार्य सिद्धीला पुढे
ईश्वरी धरुनी श्रद्धा आत्मविश्वासाकडे'.