Saturday, August 13, 2011

मनाचे उसासे मनापाशी

मनाची कवाडे उद्विग्न उदास ।
कशाला मी श्वास घेत आहे ॥

बड्या या घराचे पोकळच वासे ।
मनाचे उसासे मनापाशी ॥

आता ना कुठेही जराही आसरा ।
गोतावळा सारा दुरावला ॥

अंधार बळावे आधार लोपला
'स्वानंद' हरपला 'स्वानंदा'चा ॥

1 comment:

Atul Rane said...

'स्वानंद' हरपला 'स्वानंदा'चा ...........! mastach .....!