Saturday, December 31, 2011

प्रीतपूर्ती

आवेग वाढला बांध फुटे तो आज
डोळ्यांतील आता उडून गेली लाज
अंगाला भिडले अंग सोडूनी रीत
नि पूर्ण जाहली दोघांची ती प्रीत

ही कुठली आली झिंग कळेना दोघा
हा कुठला त्यांना बांधून ठेवी धागा
गुंफले तयांनी शब्द सुरांनी गीत
नि पूर्ण जाहली दोघांची ती प्रीत

क्षण निघून गेले उरे भावना हाती
रुजवली जिने आजन्मांची ही नाती
हा विरहच आता ह्रदयांना जाळीत
नि पूर्ण जाहली दोघांची ती प्रीत

विरहातच फुलते प्रीति या जगतात
विरहातच जगती प्रेमिक जगि दिनरात
विरहात दरवळे मधु-मिलन संगीत
परिपूर्ण होतसे दोघांचीही प्रीत

- स्वानंद

4 comments:

Sakhi said...

पूर्तीचा आनंद !!!
छान :)

Atul Rane said...

wahhhhhhhhhh............shabda nahit taarif karayla ...! apratim ! :)

श्रिया (मोनिका रेगे) said...

तुझ्या कवितेत गीत असते, सुंदर चाल लागली तर ओळी गुणगुणता येतील.....सुंदर लिहितोस.

श्रिया (मोनिका रेगे) said...

तुझ्या कवितेत गीत असते, सुंदर चाल लागली तर ओळी गुणगुणता येतील.....सुंदर लिहितोस.