Friday, July 8, 2011

का गडे झुकल्या पापण्या खाली?

का गडे झुकल्या पापण्या खाली?
गोरट्या गाला का चढे लाली

रंग संध्येचे त्या अनंताने
रेखिले भोळ्या लाजर्‍या गाली

मंद सुटलेला केशरी वारा
गंध उधळीतो कुंद भोताली

भेटलो होतो बोलण्यासाठी
शब्द विरलेले थांबली बोली

दूर ऐकू ये राऊळी घंटा
तेथ ती मीरा कृष्ण ओवाळी

- स्वानंद

1 comment:

श्रिया (मोनिका रेगे) said...

स्वानंद खूप छान झाली आहे कविता शेवट अप्रतीम!